रविवार, १२ जून, २०११

० ते ९ अंकाचा हा खेळ असतो

जेंव्हाही आपण लॉटरी बद्दल बोलतो, आपण आपल्या नशिबाचा  विचार करतो.  आपण म्हणतो 'मी एव्हढा नशीबवान नाहीये कि मला शंभर रुपये सुद्धा लॉटरीतून मिळतील'.  मग हजारोंचा प्रश्नच नाही. पण मी सांगतो प्रत्येक वेळेस नशिबाची  आवश्यकता नसते. 

आपल्याला माहितेय  ऑनलायीन लॉटरी कसी चालते. ० ते ९ अंकाचा हा खेळ असतो.  ० ते ९ या अंकापैकी कुठला तरी अंक येतो. आता कुठला अंक येतो हे कसा कळणार? या निसर्गात प्रत्येक खेळ हा नियमानेच चालतो. अगदी हा ऑनलायीन लॉटरी चा सुद्धा...

एक रुपयाचं नाण घ्या,  हवेत उडवून छापा काटा करा. कमीत कमी २०-२५ वेळा ते नाण हवेत उडवा आणि काय होतं ते बघा.  निरीक्षण करा. काय- काय 'शक्यता' निर्माण होतात ते तुमच्या लक्षात येईल . किती वेळा छापा पडतो आणि किती वेळा काटा येतो? 

अस निरीक्षण करतानाच आणखी सूक्ष्म निरीक्षण करा. किती वेळा सलग छापा पडतो आणि किती वेळा सलग काटा पडतो?  

तुमच्या अस लक्ष्यात येईल एकदा छापा पडायला लागला कि सतत ८ ते ९ वेळा छापाच पडतो किंवा एकदा काटा पडायला लागला कि सतत ८ ते ९ वेळा काटाच पडतो.  अश्याच पद्धतीने लॉटरीचे अंक येतात. एकदा सम अंक यायला लागले कि सलग ८ ते ९ वेळा सम अंकच येतात. व तसेच विषम अंक येतात. जर तुम्ही जुन्या लॉटरीचे निकाल तपासले तर तुम्हाला यातली सत्यता कळून येईल. या आणि अशाच नियमाने  लॉटरीचा खेळ चालतो.  

आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय? आम्हाला हे सर्व माहितेय. काही असही म्हणतील कि अस कुठलच तंत्र उपलब्ध नाहीये ज्याने लॉटरी जिंकता येईल वगैरे वगैरे.

आपल्याला ब-याच गोष्टी माहित असतात पण आपण त्या किती अमलात आणतो.

आपल्याला माहित आहे कि जोरात गाडी चालवू   नये पण .........
आपल्याला माहित आहे कि रागाऊ नये पण ........
आपल्याला माहित आहे कि जर नियमित योगाभ्यास केला तर तब्येत चांगली राहते पण......
आपल्याला माहित आहे कि सिगारेट पिणे शरीरास हानिकारक आहे पण....

असो. 

आपला 
निलेश 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा