मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

नमस्कार मित्रानो 


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! नवीन वर्ष सर्वाना भरभराटीचे जावो हि परमेश्वर चरणी प्रार्थना ! 




लॉटरीमध्ये रिस्क असतेच. रिस्क आहे म्हणून पैसा जास्त दिसतो. ज्या व्यवसायात अजिबातच रिस्क नाही अश्या व्यवसायात किती मार्जिन मिळू शकते. पारले बिस्किटचा  पुडा विकताना 'विक्री न होण्याची काही रिस्क आहे का ?' अर्थात  त्यामुळेच दुकानदाराला पारलेचा पुडा विकून अत्यल्प  मार्जिन मिळते. 

पण रिस्क घेताना क्रिकेटचा नियम वापरला तर शतक ठोकता येत. क्रिकेट खेळताना सुद्धा रिस्क घ्यावीच लागते तरच फोर सिक्स वसूल करता येतात. फक्त हि रिस्क अभ्यासपूर्वक घ्यावी लागते. आंधळी रिस्क यात काही उपयोगाची नाही. 

अश्या प्रकारच्या रीस्कला हल्ली Calculated  रिस्क म्हणतात. आणि हीच रिस्क लॉटरीमध्ये फायदेशीर ठरते. 

असो ! शेवटी नवीन वर्षात 'जो जे वांछील तो ते लाहो ...' हीच पुन्हा एकदा ईश्वर चरणी प्रार्थना..!


आपला 
निलेश पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा